एशियन गेम्स: भारतीय महिला हॉकी संघ उंपात्य फेरीत दाखल; कर्णधार राणी रामपालची हॅट्रिक

जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय महिला हॉकी संघाने थायलंडचा ५-० असा पराभव करत उंपात्य फेरीत प्रवेश केला आहे. यावेळी भारतीय कर्णधार राणी रामपालने गोलची हॅट्रिक केली.

या सामन्याच्या सुरूवातीला थायलंडने वर्चस्व दाखवले पण नंतर ५व्या मिनिटाला राणीने रिव्हर्स शॉट मारला जो की गोलपोस्टच्या जवळून गेला. याच वेळेत भारताला पहिली पेनाल्टी कॉर्नर मिळाली पण थाई डिफेंडरने दीप ग्रेस एक्काने केलेला तो गोल वाचवला.

भारताला पुढे अजून तीन पेनाल्टी कॉर्नर मिळाल्या पण थाईच्या डिफेंडरनी त्या सगळ्या अडवून चांगला बचावात्मक खेळ केला. तरीही भारताने त्यांचे आक्रमण सुरूच ठेवले होते. ३७व्या मिनिटाला राणीने गोल करत भारताचे खाते उघडले.

राणीने ४६व्या तर मोनिकाने ५२व्या मिनिटाला गोल करत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या दहा मिनिटांमध्ये काही वेळेस थाई संघाने हार मानल्यासारखा खेळ केला.

तसेच नवजोत कौरने ५५व्या तर राणीने ५६व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय पक्का केला.

जागतिक क्रमावरीत नवव्या स्थानावर असणाऱ्या भारताने याआधी दक्षिण कोरियाला ४-१ने पराभूत केले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: सायना नेहवालचे हे पदक का आहे भारतासाठी खास?

पीव्ही सिंधूने एशियन गेम्सच्या अंतिम फेरीत प्रवेश करत रचला इतिहास

वाढदिवस विशेष- दिग्गज फलंदाज सर डॉन ब्रॅडमनबद्दल या १० गोष्टी माहित आहेत का?