एशियन गेम्स: भारताला महिलांच्या थाळीफेक तसेच 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक

इंडोनेशियात सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारताच्या सीमा पुनियाने थाळीफेकीत तर धावपटू चित्रा उन्नीकृष्णनने महिलांच्या 1500मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले आहे.

35 वर्षीय सीमाने 62.26 मीटर थाळीफेक करत तिच्या सहा वर्षातील उत्कृष्ठ कामगिरी केली आहे.

यावेळी चीनच्या चेंग यांगने 65.12 मीटर अंतर पार करत सुवर्णपदक तर फेंग बीनने शेवटच्या प्रयत्नात 64.25 मीटर थाळीफेक करत रौप्यपदक पटकावले.

सीमाने तिसऱ्या प्रयत्नात 62.26 मीटर थाळीफेक केले. यावेळी तिने 2014च्या एशियन गेम्समध्ये केलेला 61.03 मीटरचा विक्रम मोडला. तिच्याकडे आता राष्ट्रकुल स्पर्धेचे चार आणि एशियन गेम्सचे दोन पदके आहेत. यामुळे ती भारताची उत्कृष्ठ थाळीफेकपटू ठरली आहे.

तर संदिप कुमारी यावेळी 54.61 मीटरने पाचव्या स्थानावर राहिली. तिची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी 58.41 मीटर आहे.

चित्राने 1500मीटर शर्यत 4मिनिटे 12.56 सेंकदात पुर्ण केली. तर बहरिनच्या कल्कीदन बेफ्कादूने 4 मिनिटे 7.88 सेंकद नोंदवत सुवर्ण आणि बहरिनच्याच टिगिस्ट बेलेने रौप्यपदक पटकावले. तिने 4 मिनिटे 9.12 सेंकदात ही शर्यत पुर्ण केली.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय महिलांना सुवर्ण तर पुरूषांना रौप्यपदक

एशियन गेम्स: भारताचा धावपटू जीन्सन जॉन्सनला पुरूषांच्या १५०० मीटरच्या शर्यतीत सुवर्णपदक

क्रीडामंत्री राजवर्धनसिंग राठोडांच्या व्हायरल फोटोचे सत्य आले बाहेर