एशियन गेम्स: पीव्ही सिंधूचे ऐतिहासिक सुवर्ण हुकले, रौप्यपदकवार मानावे लागले समाधान

जकार्तामध्ये सुरू असलेल्या एशियन गेम्समध्ये भारतीय स्टार बॅटमिंटनपटू पीव्ही सिंधूने ऐतिहासिक रौप्यपदक पटकावले आहे. एशियन गेम्समधील भारताचे हे बॅटमिंटन एकेरीतील कांस्यपदकाशिवाय पहिलेच रौप्यपदक आहे.

सिंधूला अंतिम फेरीत चायनीज तैपईच्या ताइ त्झू यींगकडून १३-२१, १६-२१ असे पराभूत व्हावे लागले. यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

२३ वर्षीय सिंधूने उंपात्य सामन्यात जपानच्या अकान यमागुचीला पराभूत केले होते. तर सोमवारी (२७ ऑगस्ट) सायना नेहवालने एकेरीत कांस्य पदक जिंकले आहे.

सायनाचे हे एशियन गेम्समधील बॅटमिंटनसाठीचे एकेरीतील दुसरे तर महिलांमधील पहिले पदक ठरले होते. याआधी १९८२ला भारताकडून पुरूष एकेरीत सईद मोदींनी पदक जिंकले होते.

सिंधूची कामगिरी: 

२०१८ एशियन गेम्स, जकार्ता- रौप्य (एकेरी)

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा, गोल्ड कोस्ट- रौप्य (एकेरी)

२०१८ राष्ट्रकुल स्पर्धा, गोल्ड कोस्ट- सुवर्ण (मिश्र संघ)

२०१८ वर्ल्ड चॅम्पियनशीप, नानजिंग- रौप्य (एकेरी)

२०१७ वर्ल्ड चॅम्पियनशीप, ग्लासगो- रौप्य (एकेरी)

२०१६ ऑलिंपिक, रियो दी जानिरो- रौप्य (एकेरी)

२०१४ वर्ल्ड चॅम्पियनशीप, कोपनहेगन- कांस्य (एकेरी)

२०१४ एशियन गेम्स, इंचेऑन- कांस्य (एकेरी)

२०१४ एशियन चॅम्पियनशीप, गिमचेऑन-  कांस्य (एकेरी)

२०१३ वर्ल्ड चॅम्पियनशीप, गुआंगझोयु- कांस्य (एकेरी)

तसेच भारताने आतापर्यंत एशियन गेम्समध्ये 45 पदके जिंकली असून त्यात 8 सुवर्ण 16 रौप्य आणि 21 कांस्य पदकांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्स: नीना वराकिलने लाँग जम्पमध्ये मिळवले रौप्यपदक

एशियन गेम्स: भारताच्या सुधा सिंगने पटकावले स्टिपलचेसमध्ये रौप्यपदक

एशियन गेम्स: धरूण अय्यास्वामीने जिंकले ऐतिहासिक रौप्यपदक