असे असेल एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी ग्रुप, भारत अ गटात

गोरगन, इराण येथे होणाऱ्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ अ गटात खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे होणार आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबर रोजी सकाळी इराणला मार्गस्थ होईल.

भारतीय पुरुष संघ ज्या गटात आहे त्यात पाकिस्तान, इराक ,अफगाणिस्तान आणि जपान हे देश आहेत तर महिलांच्या अ गटात भारताबरोबर थायलँड, दक्षिण कोरिया, चीनी तायपेई आणि तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. प्रत्येक गटातून दोन संघ हे उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. 

१४ खेळाडूंच्या भारतीय पुरुष संघाचे नेतृत्व अपेक्षप्रमाणे अनुभवी अजय ठाकूरकडे देण्यात आले आहे तर महिला संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या अभिलाषा म्हात्रे करणार आहे. पुरुष संघाचे उपकर्णधारपद सुरजीतकडे तर महिला संघाचे उपकर्णधारपद प्रियंकाकडे देण्यात आले आहे.

एशियन कबड्डी चॅम्पियनशिप (पुरुष)
अ गट- भारत, पाकिस्तान, इराक ,अफगाणिस्तान आणि जपान
ब गट- इराक, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान

एशियन कबड्डी चॅम्पियनशिप (महिला)
अ गट- भारत, दक्षिण कोरिया, चीनी तायपेई, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान
ब गट- इराक, जपान, श्रीलंका, इराक आणि पाकिस्तान

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघ: अजय ठाकूर(कर्णधार), सुरजीत(उपकर्णधार), दीपक हुडा, महेंद्र सिंह ढाका, मणिंदर सिंग, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, विशाल भारद्वाज.

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला संघ: अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचन ज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका(उपकर्णधार), प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितू, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया