एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे वेळापत्रक जाहीर !

गोरगन । येथे होणाऱ्या पुरुषांच्या १०व्या तर महिलांच्या ५व्या एशियन कबड्डी चॅम्पियनशिपचे आज वेळापत्रक जाहीर झाले आहे . भारतीय पुरुष आणि महिलांचा संघ अ गटात खेळणार आहे. ही स्पर्धा २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे होणार आहे. भारतीय संघ २२ नोव्हेंबर रोजी सकाळी इराणला मार्गस्थ होईल.

भारतीय पुरुष संघाचा पहिला सामना २४ नोव्हेंबर सकाळी ८वाजता इराक संघाशी तर दुसरा सामना २५ तारखेला भारतीय संघ सकाळी ८ वाजता अफगाणिस्तानबरोबर दोन हात करेल तर दुपारी २ वाजता जपान सोबत साखळी फेरीतील तिसरा सामना खेळेल. त्याच दिवशी संध्याकाळी ५वाजता पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी स्पर्धेतील चौथा साखळी सामना खेळेल.

२६ तारखेला सकाळी ९:३० आणि १०:३० वाजता उपांत्यफेरीचे सामने होणार असून अंतिम सामना त्याच दिवशी संध्याकाळी ४वाजता होईल.

भारतीय महिला संघाचा पहिला सामना २४ नोव्हेंबर रोजी चीनी तायपेई संघाबरोबर दुपारी २ वाजता तर दुसरा सामना त्याच दिवशी संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे. तिसरा सामना २५ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता तुर्कमेनिस्तानबरोबर तर शेवटचा साखळी सामना कोरियाबरोबर त्याच दिवशी संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे.

२६ तारखेला सकाळीच ८ वाजता दोन्ही उपांत्यफेरीचे सामने होणार असून अंतिम सामना दुपारी २ वाजता होणार आहे.

स्पर्धेचे बक्षीस वितरण २६ तारखेला संध्याकाळी ५ वाजता होणार आहे.

भारतीय पुरुष कबड्डी संघाचे सामने:
२४ नोव्हेंबर: भारत वि. इराक, सकाळी ८ वाजता
२५ नोव्हेंबर: भारत वि अफगाणिस्तान, सकाळी ८वाजता
२५ नोव्हेंबर: भारत वि. जपान, दुपारी २ वाजता
२५ नोव्हेंबर: भारत वि. पाकिस्तान, संध्याकाळी ५ वाजता
२६ नोव्हेंबर: उपांत्यफेरी १, सकाळी ९:३० वाजता
२६ नोव्हेंबर: उपांत्यफेरी २, सकाळी १०:३० वाजता
२६ नोव्हेंबर: अंतिमफेरी, संध्याकाळी ४ वाजता

भारतीय महिला कबड्डी संघाचे सामने:
२४ नोव्हेंबर: भारत वि. चीनी तायपेई, दुपार २ वाजता
२४ नोव्हेंबर: भारत वि. थायलँड, संध्याकाळी ६:३० वाजता
२५ नोव्हेंबर: भारत वि तुर्कमेनिस्तान, सकाळी ११ वाजता
२५ नोव्हेंबर: भारत वि. कोरिया, संध्याकाळी ६:३० वाजता
२६ नोव्हेंबर: उपांत्यफेरी १, सकाळी ८:०० वाजता
२६ नोव्हेंबर: उपांत्यफेरी २, सकाळी ८:०० वाजता
२६ नोव्हेंबर: अंतिमफेरी, दुपारी २ वाजता

एशियन कबड्डी चॅम्पियनशिप (पुरुष)
अ गट- भारत, पाकिस्तान, इराक ,अफगाणिस्तान आणि जपान
ब गट- इराक, दक्षिण कोरिया, श्रीलंका, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान

एशियन कबड्डी चॅम्पियनशिप (महिला)
अ गट- भारत, दक्षिण कोरिया, चीनी तायपेई, थायलंड आणि तुर्कमेनिस्तान 
ब गट- इराक, जपान, श्रीलंका, इराक आणि पाकिस्तान

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय पुरुष संघ: अजय ठाकूर(कर्णधार), सुरजीत(उपकर्णधार), दीपक हुडा, महेंद्र सिंह ढाका, मणिंदर सिंग, मोहित चिल्लर, नितीन तोमर, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रोहित कुमार, सचिन, संदीप नरवाल, सुरेंदर नाडा, विशाल भारद्वाज.

असा आहे एशियन कबड्डी चॅम्पियनशिपसाठी भारतीय महिला संघ: अभिलाषा म्हात्रे (कर्णधार), कांचन ज्योती दीक्षित, कविता, मनप्रीत कौर, मारिया मोनिका, पायल चौधरी, प्रियंका(उपकर्णधार), प्रियंका नेगी, रणदीप कौर खेडा, रितू, साक्षी कुमारी, सायली जाधव, शमा परवीन, सोनिया