आशियाई कुस्ती स्पर्धेत ओंकार पाटीलला रौप्य तर अनिल वाघमोडे कांस्यपदकाचा मानकरी

एशियन स्कूल बॉईज ग्रीकोरोमन फ्रीस्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिप : वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुलाचे मल्ल

पुणे । इराण -तेहरान येथे २ ते ३ आॅगस्ट २०१८ दरम्यान झालेल्या एशियन स्कूल बॉईज ग्रीकोरोमन फ्रीस्टाईल रेसलिंग चॅम्पियनशिप २०१८ या स्पर्धेत सह्याद्री कुस्ती संकुलातील मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली.

ओंकार पाटील याने ५७ किलो वजनी गटात ग्रीकोरोमन प्रकारात रौप्य पदक मिळवून दिले. तर अनिल वाघमोडे याने फ्रीस्टाईल गटात भारताला कांस्य पदक मिळवून दिले.

वारजे येथील सह्याद्री कुस्ती येथे हे मल्ल करीत आहेत. संकुलाचे संस्थापक अध्यक्ष विजय बराटे तसेच संकुलातील एनआयएस प्रशिक्षक संदीप पठारे, सियानंद दहिया, दिलीप पडवळ, परिक्षीत पाटील, रामभाऊ जवळकर, संदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही मल्ल सराव करीत आहेत.

हिंद केसरी अमोल बराटे, आणि इतर मल्लांनी दोन्ही मल्लांचे अभिनंदन केले.

विजय बराटे म्हणाले, वारजे येथील सह्याद्री कुस्ती संकुल मागील २०१० पासून चांगले मल्ल तयार होऊन ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावेत यासाठी प्रयत्नशील आहे. संकुलातील अनेक मल्ल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत आहेत.

मुलींमध्ये मनिषा देवेकर, सोनाली तोडकर तसेच मुलांमध्ये विष्णू खोसे, रमेश इंगवले, विनायक मोळे, आकाश माने, राजू हिप्परकर यांसारखे राष्ट्रीय पदक विजेते मल्ल आगामी स्पर्धेसाठी तयार करत आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

अंबाती रायडूसाठी भारताचा सलामीवीर उतरला मैदानात

ड्वेन ब्रावोचा मैदानाबाहेर पुन्हा एकदा धुमाकूळ