तरच टीम इंडिया जिंकणार चौथा कसोटी सामना…

साउथॅंप्टन | इंग्लंड विरुद्ध भारत संघात द रोज बॉल मैदानावर सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतासमोर २४५ धावांचे लक्ष ठेवले आहे.

हा सामना जिंकुन इंग्लंड मालिकाविजयासाठी तर भारत मालिकेत बरोबरी साधण्यासाठी इच्छुक आहे.

आशिया खंडाबाहेर केवळ दोन वेळा आशिया खंडातील देशाने २४५ किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

तब्बल ११८ सामन्यात आशिया खंडातील देशांना इंग्लंड, आॅस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, विंडीज आणि न्यूझीलंड देशांत २४५ धावांचे विजयी लक्ष मिळाले आहे. यातील तब्बल ८० सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

तर ३५ सामने अनिर्णित राहिले आहेत. जे दोन विजय आशियायी देशांनी मिळवले आहेत त्यातील १९७६मध्ये भारताने विंडीजविरुद्ध पोर्ट आॅफ स्पेनला ४०३ धावा करत सामना जिंकला होता. तर पाकिस्तानने २००३ला न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटीत २७४ धावा करत सामना जिंकला होता.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात निवड झालेल्या 20 वर्षीय क्रिकेटपटूने मानले राहुल द्रविडचे आभार

एशियन गेम्स: पाकिस्तानला हरवत भारतीय पुरूष हॉकी संघाने पटकावले कांस्यपदक

एशियन गेम्स: बॉक्सिंगमध्ये अमित पांघलला सुवर्णपदक