पतवंड खेळवायच्या वयात (८०) त्यांनी केले राष्ट्रकूल स्पर्धेत पदार्पण

गोल्ड कोस्ट । २१ वी राष्ट्रकुल स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी जेवढी खास ठरत आहे तेवढीच ती यात होणाऱ्या विक्रमांमुळेही लक्षात राहत आहे. अनेक भारतीय खेळाडूंनीही या स्पर्धेत विक्रम केले आहे.

परंतू आज एक खास विक्रमही झाला आहे जो खरे क्रीडाप्रेमी कधीही विसरणार नाहीत. कॅनडाच्या रॉबर्ट पिटकेयर्न या खेळाडूने वयाच्या ७९ वर्ष आणि ९ महिन्याचे झाल्यावर या स्पर्धेत पदार्पण केले आहे.

याबरोबर राष्ट्रकुल स्पर्धेत पदार्पण करणारा खेळाडू होण्याचा मानही मिळवला आहे. त्यांनी सोमवारी राष्ट्रकूलमध्ये शूटींगमध्ये पदार्पण केले आाणि अंतिम फेरीत त्यांनी भाग देखील घेतला.

त्यांनी इंग्लंडच्या डोरीन फ्लँडर्सचा विक्रम यांचा सर्वात वयस्कर खेळाडूचा राष्ट्रकूलमध्ये भाग घेण्याचा विक्रमही मोडला आहे. डोरीन फ्लँडर्स यांनी २०१४च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ७९व्या वाढदिवसालाच भाग घेतला होता.

पायलट पदावर कार्यरत असणाऱ्या रॉबर्ट पिटकेयर्न यांनी १९८८मध्ये कॅनडाच्या हवाई दलातून निवृत्ती घेतली आहे.