ISL 2017: एटीके समोर चेन्नईन एफसीचे कडवे आव्हान

आज इंडियन सुपर लीगच्या ४ थ्या आठवड्याच्या साखळी सामन्यात ॲटलेटिको डी कोलकाता(एटीके) समोर चेन्नईन एफसीचे कडवे आव्हान असेल. सामना चेन्नईच्या घरच्या मैदानावर असल्याचा फायदा पण चेन्नईन एफसीला मिळेल.

आयएसएलचा सर्वात यशस्वी संघ समजला जाणारा एटीके या मौसमात गुणतालीकेत ३ सामन्यात २ गुणांसह १०व्या स्थानावर आहे तर चेन्नईन एफसी ३ सामन्यात ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

चेन्नईन एफसीने ३ सामन्यात २ विजय मिळवले आहेत तर एटीकेला अजून आपला पहिला विजय मिळवण्यात यश आले नाही. त्यांनी २ सामने बरोबरीत सोडवले तर १ सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला आहे.

लीगच्या पुढील काही सामन्यात विजय मिळवून एटीकेला आपला दबदबा कायम ठेवावा लागेल अन्यथा त्यांच्यासाठी लीग मध्ये पुढे रस्ता अजुनच खडतर होत जाईल.

लीग मध्ये आत्तपर्यंत ३ सामन्यात एटीकेतर्फे बिपीन सिंगने एकमेव गोल केला आहे तर चेन्नईन एफसीने ६ गोल नोंदवले आहेत. चेन्नईन एफसीने त्यांच्या मागील सामन्यात पुण्याचा ०-१ असा पराभव केला होता तर एटीकेने जमशेदपुर बरोबरचा सामना ०-० ने बरोबरीत सोडवला होता.

दोन्ही संघात आत्तापर्यंत झालेल्या ८ सामन्यात ४ सामने अनिर्णित राहीले आहेत तर ३ सामने एटीके आणि १ सामना चेन्नईन एफसीने जिंकला आहे. चेन्नईन एफसीनेच आयएसएलच्या दुसऱ्या मौसमात एटीकेला सेमी फायनल मध्ये घरचा रस्ता दाखवला होता.

नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)