एटीपी फायनल्स: रॉजर फेडररचा सलग दुसरा विजय, झवेरेवविरुद्ध पराभवाचा वचपा काढला

लंडन । ६ वेळच्या एटीपी फायनल्स विजेत्या रॉजर फेडररने स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात २० वर्षीय अलेक्झांडर झवेरेव पराभव करत अंतिम ४ खेळाडूंमध्ये स्थान मिळवले.

३६ वर्षीय फेडररने शेवटच्या सेटमध्ये अलेक्झांडर झवेरेवला अनुभवाच्या जोरावर ६-१ असे पराभूत करत सामना ७-६, ५-७, ६-१ जिंकला.

जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेवला या स्पर्धेत तिसरे मानांकन असून तो अजूनही सेमीफायनलला पात्र ठरू शकतो. त्याने या स्पर्धेत मारिन चिलीचला पहिल्या सामन्यात पराभूत केले आहे.

त्याचा पुढचा सामना फेडररविरुद्ध पराभूत झालेल्या अमेरिकेच्या जॅक सोकशी होईल. या दोघांत विजयी होणारा खेळाडू पुढच्या फेरीत प्रवेश करेल.

मारिन चिलीचलाचे मात्र स्पर्धेतील आव्हान संपुष्ठात आले आहे. तो पहिला सामना अलेक्झांडर झवेरेवविरुद्ध तर दुसरा सामना अमेरिकेच्या जॅक सोकविरुद्ध पराभूत झाला आहे.

तो शेवटचा सामना रॉजर फेडररविरुद्ध उद्या खेळणार आहे.