आक्रमण, आक्रमण आणि आक्रमण: विराटने दिला होता चहलला खास संदेश !

भारतीय लेग स्पिनर युझवेंद्र चहलने आपल्या गोलंदाजीच्या यशात कर्णधार विराट कोहलीने दाखवलेला विश्वासही महत्वाचा होता असे सांगितले आहे. तो म्हणाला विराटने गोलंदाजी करताना आत्मविश्वास दिला होता. तसेच निर्भयपणे गोलंदाजी करण्याची प्रेरणा दिली.

चहलने वनडेत ऑस्टेलियाविरुद्ध ६ बळी आणि न्यूझीलंड विरुद्ध ४ बळी घेतले होते, तेव्हा कर्णधार विराटने त्याला आक्रमण करण्याचा संदेश दिला होता.

चहल हिंदुस्थान टाइम्सशी याबाबतीत बोलताना म्हणाला ” विराटने मला सांगितले होते की जर मी मधल्या षटकात २-३ बळी जर घेतले आणि जास्त धावा दिल्या तरी त्याला काही वाटणार नाही. टी २० क्रिकेटमध्ये त्याने मला सांगितले की मी ४ षटकात ३५ धावा दिल्या आणि २-३ बळी घेतले तरी तो आनंदी असेल. “

” तिरुअनंतपुरममधील शेवटच्या टी २० सामन्यातील माझ्या दुसऱ्या षटकात योजना अशी होती की बळी घेण्यापेक्षा न्यूझीलंडला धावा घेऊ द्यायच्या नाही. कारण जर मी आक्रमण केले असते तर मला बॉलला फ्लाईट द्यावी लागली असती आणि एकत्र मला बळी भेटले असते किंवा माझ्या बॉलवर षटकार मारले असते.”

चहलने न्यूझीलंड विरुद्ध पार पडलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात ४७ धावा देत २ बळी घेऊन भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती.