कोणत्याच भारतीय गोलंदाजाला जमले नाही ते कुलदिप यादवने केले

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यात सिडनी क्रिकेट ग्राउंडवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करत असताना 622 धावांवर डाव घोषित केला. तर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 300 धावा केल्या असून भारताने त्यांना फॉलोऑन दिला आहे.

आज (6 जानेवारी) चौथ्या दिवसाच्या सामन्यात भारताकडून कुलदिप यादवने ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायन आणि जोश हेझलवूड यांना पायचीत करत दुसऱ्यांदा कसोटीत पाच विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. याआधी त्याने राजकोट येथे झालेल्या विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 57 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.

यावेळी कुलदिपने 99 धावा देत पाच विकेट्स पटकावल्या आहेत. याचबरोबर तो आशिया खंडाबाहेर तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पाच विकेट्स घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज ठरला आहे.

कुलदिपने ट्रेंट ब्रीजवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या वन-डे सामन्यात 25 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. तर ओल्ड ट्रॅफोर्डवर झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 24 धावा देत 5 विकेट्स पटकावल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

३३ वर्षांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून आला हा खास योगायोग

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग २० – चिरतरुण जाफर 

टीम इंडियाने ६२२ धावांचा डोंगर उभारण्यात पाकिस्तानच्या या तीन गोलंदाजांचेही मोठे योगदान