१९ तासांत ४ लाख लाईक्स मिळालेला पंतचा तो फोटो पाहिला का?

सिडनी। भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध शेवटचा चौथा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू आहे. या सामन्यात भारताकडून यष्टीरक्षक रिषभ पंतने नाबाद 159 धावांची खेळी केली आहे.

पंतच्या या खेळीमुळे तो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. यातच त्याने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका फोटोला 19 तासांमध्ये तब्बल 4 लाखच्यावर लाईक्स मिळाल्या आहेत. त्याने हा फोटो त्याच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना टाकला आहे.

‘कोणतीही परिस्थिती असो तू नेहमीच माझ्या पाठीशी उभी राहिली आहे. मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा तू माझ्यासोबत सराव करण्यासाठी आणि सामनान्यासाठी येत होती. तुला वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा आई’, असे कॅप्शनही पंतने फोटोला दिले आहे.

पंतने ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना 189 चेंडूत नाबाद 159 धावा केल्या आहेत. या खेळीत त्याने 15 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा तो पहिलाच भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज ठरला आहे.

त्याचबरोबर रिषभ पंत हा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वोच्च वैयक्तिक धावा करणाराही भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

रिषभ पंतच्या रूपाने टीम इंडियाला मिळाला ऍडम गिलख्रिस्ट…

या संघसहकाऱ्यामुळे रिषभ पंतने केली दिडशतकी खेळी

रिषभ पंतच्या त्या विक्रमाची चर्चा आजही देशात सुरुच

म्हणून भारत-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी सिडनी कसोटीदरम्यान पिंक कॅप दिल्या ग्लेन मॅकग्राला