या व्यक्तीच ऐकलं तर अश्विन येऊ शकतो तिसऱ्या कसोटीत ओपनिंगला

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटीसाठी भारताकडून कोणती सलामीवीर जोडी खेळणार याबाबत चर्चा सुरू आहे. पृथ्वी शॉच्या संघाबाहेर जाण्याने मंयक अगरवालला संधी मिळाली आहे. पण त्याच्यासोबत सलामीला कोण येणार यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू हनुमा विहारीने या मालिकेआधीच सलामीला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तर माजी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी मुरली विजयने सलामीला यावे असे इंडिया टीव्हीशी बोलताना सांगितले आहे.

या सगळ्या विचारांना मागे टाकत राजकीय नेते शशी थरूर यांनी आर. अश्विनने सलामीला यावे असे मत मांडले आहे.

शॉच्या संघाबाहेर जाण्याने थरुर यांनी ट्विट करत आर. अश्विनने मंयक अगरवाल सोबत सलामीला यावे सलामीला यावे असे म्हटले आहे.

आर अश्विननेच्या सलामीला येण्याने संघातील मधल्या फळीची किंवा अष्टपैलूसाठीची जागा रिकामी राहिल, असेही थरूर यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

तसेच अश्विनला सलामीला खेळण्याचा अनुभव आहे. त्याने कामगिरीला सुरुवात करताना देशांतर्गत क्रिकेटमध्ये सलामीला खेळला आहे.

केएल राहुल आणि मुरली विजय या जोडीने पहिल्या दोन कसोटी सामन्यात अनुक्रमे 48 आणि 49 धावा केल्या आहेत. तर पर्थच्या कसोटीमध्ये दोघेही शुन्यावर बाद होण्याचा विक्रम केला आहे. या दोघांच्या या वाईट कामगिरीमुळे अगरवालला संघात स्थान देण्यात आले आहे.

26 डिसेंबरला ऑस्ट्रेलिया -भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना मेलबर्न येथे होणार आहे. याआधी चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

मेस्सी-रोनाल्डो यांच्यात २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करण्यासाठी चुरस

२०१९ चा विश्वचषक जिंकला तर कर्णधार कोहलीला करावे लागेल गांगुलीचे हे भन्नाट चॅलेंज पूर्ण

भारत गमावणार २०२३च्या विश्वचषकाचे यजमानपद ?