नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने घेतला फलंदाजी करण्याचा निर्णय !

बेंगलोर । येथील चिन्नस्वामी मैदानावर आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथा वनडे सामना खेळण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथने या मालिकेतील दुसरी नाणेफेक आज जिंकली आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाला या मालिकेत एकही सामना जिंकता आलेला नाही. त्याचबरोबर संघातील फिरकी गोलदांज ऍस्टन एगार दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. ऑस्ट्रेलिया संघातून ग्लेन मॅक्सवेल, जेम्स फॉकनर आणि हिल्टन कार्टराईट यांना बसवण्यात आले आहे. तर भारताच्या संघातही भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, जसप्रित बूमराह, लोकेश राहुल यांना विश्रांती देण्यात आली आहे.

इतिहास थोडक्यात:
भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघात आजपर्यंत या मैदानावर ६ वनडे सामने झाले आहेत. २०१३ झाली झालेल्या सामन्यात रोहित शर्माने २०१९ धावांची खेळी केली होती. भारताने या मैदानावरील १३ वनडे विजय मिळवले आहेत. २०१० पासून या मैदानावरील पहिल्या डावातील सरासरी स्कोर ३०७ धावा केल्या आहेत. २०१० पासून दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत.

संघ
भारत :अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), हरदीप पंड्या, केदार जाधव, मनीष पांडे, एमएस धोनी, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद शमी, यज्वेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, अॅरॉन फिंच, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, मार्कस स्टोईनिस, पीटर हॅन्डस्कॉब, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स, नॅथन कोल्टर-नाइल, केन रिचर्डसन, अॅडम झाम्पा.