यजमान ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिका ४-० अशी जिंकली

सिडनी । ऑस्ट्रलिया इंग्लंड यांच्यातील ॲशेस मालिकेतील ५व्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ४-०अशी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजीमध्ये उस्मान ख्वाजा आणि मार्श बंधूंनी चांगली गोलंदाजी तर पॅट कमिन्सने चांगली गोलंदाजी केली.

काल ४ बाद ९३ अशी अवस्था झालेल्या इंग्लंडला आज डावाने पराभव टाळण्यासाठी २१० धावांची गरज होती. परंतु त्यात जेमेतेम ८७ धावांची भर घालून आज ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ८८.१ षटकांत १८० धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्सने ४, नेथन लायनने ३, मिचेल स्टार्स आणि जेस हेझलवूड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.