ऑस्ट्रेलिया ५० षटकांत ७ बाद ३४७

चेन्नई । येथे सुरु असलेल्या बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोईनिसने वेगवान ७० धावा करून ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ३४७ पर्यंत नेऊन ठेवली आहे.

मागील वर्षी आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना मार्कस स्टोईनिसने चांगली फलंदाजी केली होती. भारतीय खेळपट्टीवर खेळण्याच्या अनुभवचा पुरेपूर वापर करून मार्कस स्टोईनिसने ४ चौकार आणि ५ षटकार लगावले.

त्याआधी सलामीवीर डेविड वॉर्नरने ६४, कर्णधार स्टिव्ह स्मिथने ५५ आणि ट्रेव्हिस हेड ६५ यांनी अर्धशतके केली. या सराव सामन्यात ऑस्ट्रलियाच्या सर्वच फलंदाजांना फलंदाजीचा चांगलाच सराव मिळाला.

बोर्ड प्रेसिडेंट इलेव्हन संघासाठी अष्टपैलू एम. वाशिंग्टन सुंदर सर्वोत्तम गोलंदाज ठरला, त्याने दोन ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना तंबूत धाडले आणि फक्त 23 धावा दिल्या . तर मध्यमगती गोलंदाज कुशांग पटेलनेही दोन गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया: ५० षटकात ७बाद ३४७ (मार्कस स्टोनीस ७६, डेव्हिड वॉर्नर ६४, स्टीव्ह स्मिथ ५५, ट्रॅव्हिस हेड ६५, मॅथ्यू वेड ५५, एमएस वॉशिंग्टन सुंदर २/२३)