पहिली टी२०: ऑस्ट्रेलियाला पहिला झटका !

रांची। येथे चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पहिला झटका लागला आहे. ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वॉर्नर ५ चेंडूत ८ धावा करून तंबूत परतला आहे.

वनडे मालिकेत चांगली कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाला डेव्हिड वॉर्नरकडून विशेष कामगिरीची अपेक्षा होती पण भुवनेश्वर कुमारने सामन्याच्या पहिल्या षटकात दोन चौकारानंतर डेव्हिड वॉर्नरला परतीचा मार्ग दाखवला. शरीराच्या जवळच्या चेंडूवर कट मारण्याच्या नादात वॉर्नर त्रिफळाचित झाला.

नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ संघात नसल्यामुळे ग्लेन मॅक्सवेल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे. फिंच आणि मॅक्सवेल आता खेळपट्टीवर आहेत. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात जिंकण्यासाठी धावांचा डोंगर उभारणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियाने ५ षटकात ३४ धावा केल्या आहेत.