ऑस्ट्रेलिया पाठवणार का लढवय्या बांग्लादेशला स्पर्धेबाहेर ?

0 62

चॅम्पियन्स ट्रॉफी मधे आज ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन संघ आमने सामने येणार आहेत.ऑस्ट्रेलियाचा याआधीचा न्यूझीलंड बरोबरचा सामना  पावसामुळे रद्द झाला होता. ऑस्ट्रेलिया सामना हरतोय असे वाटत असतानाच पावसाने सामान थांबला. तर बांगलादेश पहिल्या सामन्यात इंग्लंडकडून हार पत्करून या सामन्यात खेळत आहे. हा सामना जर बांगलादेश हरला तर तो या चॅम्पियन्स ट्रॉफीमधून बाहेर पडणारा पहिला संघ बनेल.

बांगलादेश आपल्या गोलंदाजीवर जास्त भर देईल, कारण मागच्या सामन्यात जवळ जवळ ५० षटकात त्याना फक्त २ विकेट्स घेता आल्या होत्या. तशी बांग्लादेशची फलंदाजी मागील सामन्यात चांगली होती पण त्यांच्या फलंदाजीच्या खालच्या फळीने आणखी चांगली कामगिरी करणे अपेक्षित आहे. ऑस्ट्रेलियाला आपल्या सलामीच्या फलंदाजांकडून म्हणजेच फिंच आणि वॉर्नरकडून अपेक्षा असेल की त्यानी संघाला चांगली सुरुवात मिळवून दयावी. तर त्यांचा स्टार गोलंदाज मिशेल स्टार्कने ही या सामन्यात कामगिरी उंचवायला हवी.

मागील काही सामने

ऑस्ट्रेलिया – हार, हार, विजय, विजय, विजय.

बांग्लादेश – हार, विजय, विजय, हार, हार.

संभाव्य संघ

ऑस्ट्रेलिया –  स्टिव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर, एरन फिंच, क्रिस लीन, मोईसेस हेन्रीकेज, ग्लेन मॅक्सवेल, मैथ्यू वेड , ऍडम झाम्पा, जॉश हेझलवूड, जेम्स पॅट्टीनसन, मिशेल स्टार्क

बांग्लादेश –  तमिन इकबाल, सौम्य सरकार, शब्बीर रहमान, मुशफिकिर रहीम, महमदुल्लाह, शाकिब अल्हसन, मोसादडेक होसाईन, मेहंदी हसन, मशरफे मुर्तजा, रुबेल होसैन, मुस्ताफिझूर रहमान.

खेळपट्टी बद्दल –  प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने या मैदानावर ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. पावसाचे सावट असलेल्या या सामन्यत ही नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे सोयीचे राहील.

महासपोर्ट्स भविष्यवाणी –  ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल.

बांगलादेशचा संघ जरी आता आंतररराष्ट्रीय पातळीवर चांगला खेळ करत आला तरी, आंतराष्ट्रीय मैदानानवर खेळण्याचा अनुभव नसल्याने त्याना सामने जिंकणे अवघड जात आहे. जर बांग्लादेशच्या गोलंदाजांनी आपल्या गोलंदाजीचा स्तर उंचावला नाही तर हा सामना ऑस्ट्रलिया सहज जिंकेल.

Comments
Loading...
%d bloggers like this: