काय सांगता! या संघाने जिंकले १००० सामने…

सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आज पहिला वनडे सामना सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर 34 धावांनी विजय मिळवत 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

याबरोबरच हा विजय ऑस्ट्रेलिया संघासाठी खास ठरला आहे. त्यांचा हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 1000 वा विजय ठरला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 विजय मिळवणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला आहे.

त्यांनी आत्तापर्यंत 1852 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यातील 593 सामन्यात ते पराभूत झाले आहेत. तसेच 13 सामने बरोबरीचे तर 210 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 36 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया पाठोपाठ सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत इंग्लंड असून त्यांनी 774 सामन्यात विजय मिळवले आहेत. त्यापाठोपाठ भारताने 711 सामन्यात विजय मिळवले आहेत.

भारताने आत्तापर्यंत 1597 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यातील 711 सामन्यात विजय तर 615 सामन्यात पराभव स्विकारला आहे. तसेच 11 सामने बरोबरीत, 217 सामने अनिर्णित राहिले आहेत आणि 43 सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय मिळवणारे संघ – 

1000 – ऑस्ट्रेलिया (सामने – 1852)

774 – इंग्लंड (सामने – 1833)

711 – भारत (सामने – 1597)

702 – पाकिस्तान (सामने – 1464)

608 – विंडीज (सामने – 1434)

596 – दक्षिण आफ्रिका (सामने – 1137)

522 – श्रीलंका (सामने – 1221)

488 – न्यूझीलंड (सामने – 1296)

महत्त्वाच्या बातम्या-

हिटमॅन रोहित शर्माने केली गांगुलीच्या दादा विक्रमाशी बरोबरी

इतक्या दिवसाची प्रतिक्षा असलेला एमएस धोनीचा तो विक्रम अखेर पूर्ण

ऍरॉन फिंचची विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारचा दिग्गजांच्या यादीत समावेश