दिग्गज खेळाडू म्हणतो, स्मिथ आणि वॉर्नरची ऑस्ट्रेलिया संघाला नितांत गरज आहे

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि धडाकेबाज सलामीवीर डेव्हीड वॉर्नर यांना मिळालेली शिक्षा ही खुप गंभीर आहे. पण या दोघांची संघाला आता उणीव जाणवत आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज शेन वॉर्नने मांडले आहे.

स्मिथ, वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांना दक्षिण आफ्रिकविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूशी छेडछाड केल्याच्या प्रकरणावरून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने बंदी घातली आहे. यामध्ये संघाचे माजी कर्णधार आणि माजी उपकर्णधार यांना १२ महिन्यांची बंदी घातली आहे.

वॉर्नच्या मते स्मिथ आणि वॉर्नर या दोन स्टार खेळाडूंचा संघात नसल्याने ऑस्ट्रेलियाचे खुप नुकसान होत आहे. तर त्यांनी परत आल्यावर लवकरच संघाला सांभाळावे. स्वत: वॉर्नला २००३मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटचा डोपिंगच्या नियमाचा भंग केल्याने संघाच्या बाहेर बसावे लागल्याचा अनुभव आहे.

संघात परत येणे ही बाब त्यांना अस्वस्थ करणारी आहे, पण ऑस्ट्रेलियन क्रिकेटला त्यांची नितांत गरज आहे, असे वॉर्न म्हणाला.

“स्मिथ आणि वॉर्नरला मिळालेली शिक्षा खुप चुकीची आहे. कारण, त्यांच्या विरुद्ध विरोधी संघाच्या कर्णधारानेच  दोन वेळा चेंडूशी छेडछाड केली आहे”, असेही वॉर्न म्हणाला.

वॉर्नचे नो स्पिन हे नवीन आत्मचरित्र आले आहे. हे आत्मचरित्र त्याच्या वैयक्तिक जीवन आणि खेळाच्या कारकिर्दीवर अवलंबून आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

नॅथन लियॉनने फक्त 6 चेंडूत घेतल्या तब्बल 4 विकेट

अबब! या महिला संघाने तब्बल ५७१ धावांनी जिंकला वनडे सामना