आॅस्ट्रेलियाच्या नॅथन लिओनचा पाकिस्तानला दणका क्रिकेटमध्ये भीमपराक्रम

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेपुर्वी 29 सप्टेंबरपासून दुबईत ऑस्ट्रेलियाचा सराव सामना पाकिस्तान अ बरोबर सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लिओनने 8 बळी मिळवले आहेत.

फिरकीसाठी अनुकुल असलेल्या धीम्या खेळपट्टीवर त्याने 39.1 ओव्हर टाकताना 103 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या तब्बल आठ फलंदाजांना माघारी धाडले आहे.

या सामन्यात पाकिस्तानचा संघ 278 धांवापर्यंतच मजल मारू शकला. पाकिस्तानकडून अबिद अलीने 85 धावा करत संघर्ष केला. अस्लम सामीने 51 धावा करत त्याला साथ दिली. त्यांच्याशिवाय एकही खेळाडू लिओनचा सामना यशस्वीपणे करू शकला नाही.

प्रत्युतरादाखल ऑस्ट्रेलियाने 2 गड्यांच्या मोबदल्यात 291 धावा केल्या आहेत. शॉन मार्श आणि मिचेल मार्श अनुक्रमे 84 आणि 99  धावांवर खेळत आहेत.

पाकिस्तान अ’कडून वकास मसुद आणि इक्तिखार अहमदने प्रत्येकी एक गडी बाद केले आहेत.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना 7 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. दोन कसोटीनंतर ऑस्ट्रेलियासंघ 3 टी-20 सामने खेळणार असून पहिला सामना 24 ऑक्टोबरला अबुधाबीत होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भारतीय कसोटी संघात समावेश झालेला खेळाडू म्हणतोय, माझ्यावर द्रविडचा प्रभाव

-ISL 2018: नॉर्थइस्टवर पहिल्या विजयाची लॉबेरा यांना आशा

-“पाकिस्तानला एकही रुपया देणार नाही”- अनुराग ठाकूर