HWL 2017: ऑस्ट्रेलियाचा आज जर्मनी विरुद्ध उपांत्य फेरी सामना

भुवनेश्वर: हॉकी वर्ल्ड लीग फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरी सामना जर्मनी विरुद्ध असणार आहे. हा सामना जिंकणारा संघ अंतिम सामन्यात पोहोचेल व विजयासाठी अर्जेंटिनाशी सामना खेळेल. 

या आधीही दोन्ही संघाचा सामना झाला होता. दोन्ही संघाने १-१ असे गुण करून सामना बरोबरीत सोडवला. तसेच या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाचा उपांत्यपूर्व फेरी सामना स्पेन बरोबर होता. या सामन्यात ऑस्ट्रलियाने ४-१ अश्या मोठ्या फरकाने स्पेनचा पराभव करून हा सामना जिंकला व उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेत जर्मनीचा उपांत्यपूर्व फेरी सामना नेदरलँड्स संघाबरोबर होता. या सामन्यात दोन्ही संघाने ३-३ गुण केले. नंतर जर्मनीने पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-३ अश्या फरकाने नेदरलँड्सचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

या स्पर्धेतील साखळी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी चांगली होती. ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारता विरुद्ध होता. हा सामना ऑस्ट्रेलियाने १-१ असा बरोबरीत सोडवला. तर दुसरा सामना जर्मनी विरुद्ध होता सामना २-२ अश्या बरोबरीने सोडवला. व तिसरा सामना इंग्लड विरुद्ध होता. हा सामना ही ऑस्ट्रेलियाने २-२ अश्या बरोबरीने सोडवला.

जर्मनीने पहिल्याच सामन्यापासून विजयी सुरुवात केली होती. या स्पर्धेतील साखळी सामन्यात जर्मनीचा पहिला सामना इंग्लड विरुद्ध होता. या सामन्यावर जर्मनीने २-० अश्या फरकाने विजय मिळविला. दुसरा सामना ऑस्ट्रलिया विरुद्ध होता. हा सामना जर्मनीने २-२ अश्या बरोबरीने सोडवला. तर तिसरा सामना भारताविरुद्ध होता. या सामन्यात जर्मनीने २-० अश्या फरकाने भारताला पराभव करून हा सामना ही जिंकला.

या स्पर्धेत दोन्ही संघाची कामगिरी उत्तम आहे. त्यामुळे हा सामना नक्की कोण जिंकेल याची सर्वांनाच उत्सुकता आहे. जागतिक क्रमवारीत ऑस्ट्रलिया दुसऱ्या स्थानावर आहे, तर जर्मनी पाचव्या स्थानावर आहे.

हा सामना आज भुनेश्वर येथील कलिंगा स्टेडियमवरती होणार असून सामना संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होईल.