संपूर्ण वेळापत्रक: ऑस्ट्रेलिया संघाचा भारत दौरा

श्रीलंका दौऱ्यात मिळवलेल्या निर्भळ यशानंतर भारतीय संघ भारतात ऑस्ट्रेलिया संघाशी दोन हात करणार आहे. मर्यादित षटकांच्या या मालिकेचे ५ वनडे सामने खेळवले जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा दौरा केला होता तेव्हा केवळ ४ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती.

या मालिकेतील सर्व सामने हे दिवस रात्र स्वरूपातील असून दौऱ्याची सुरुवात १७ सप्टेंबर रोजी चेन्नई वनडेने होईल. ५ सामन्यांपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला एक सामना आला असून तो मालिकेतील शेवटचा सामना १ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेचे वेळापत्रक:
१७ सप्टेंबर । पहिली वनडे । चेन्नई । दुपारी १ वाजून ३० मि.
२१ सप्टेंबर । दुसरी वनडे । कोलकाता । दुपारी १ वाजून ३० मि.
२४ संप्टेंबर । तिसरी वनडे । इंदोर । दुपारी १ वाजून ३० मि.
२८ संप्टेंबर । चौथी वनडे । बेंगळुरू । दुपारी १ वाजून ३० मि.
१ ऑक्टोबर। पाचवी वनडे । नागपूर । दुपारी १ वाजून ३० मि.