२०११विश्वचषक विजेत्या टीम इंडियातील ३ खेळाडू आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत करणार समालोचन

भारतीय संघाचा आॅस्ट्रेलिया दौरा हा इंग्लंड तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासारखाच गाजणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यात अतिशय कठीण परिस्थितीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीनही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दोन हात करताना दिसणार आहे.

भारतीय संघाने येथे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये जरी चांगली कामगिरी केली असली तरी कसोटी क्रिकेटमध्ये संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष आहे.

अशा या ‘हाय व्होल्टेज’ मालिकेत समालोचकही तगडे असावेत असाच काहीसा विचार या स्पर्धेचं प्रसारण करणाऱ्या सोनी टीव्हीने केलेला दिसतोय.

म्हणुन या वेळी समालोचन कक्षात गौतम गंभीरसारखा गंभीर खेळाडू दिसणार आहे. गंभीरने यापुर्वी २००८ आणि २०११ या दोन वर्षी आॅस्ट्रेलियाचा दौरा केला आहे. यावेळी प्रथमच गंभीर आॅस्ट्रेलियात हातात मायक्रोफोन घेऊन समालोचन करताना दिसेल.

भारताचा हा दौरा २१ नोव्हेंबर रोजी ३ सामन्यांच्या टी२० मालिकेने सुरु होत असून त्यानंतर ४ कसोटी आणि शेवटी ३ वन-डे सामने होणार आहे.

समालोचन कक्षात दिसणार मोठी नावं- 

यावेळी समालोचन कक्षात सुनिल गावसकर, मायकेल क्लार्क, हर्षा भोगले, गौरव कपूर, संजय मांजरेकर, मुरली कार्तिक, हरभजन सिंग, मोहम्मद कैफ, अशिष नेहरा, मार्क बाऊचर, निक नाईट, डाॅमनिक कोर्क, दिपदास गुप्ता आणि विवेक राजदान सारखे रथी- महारथी दिसणार आहे.

याच पॅनेलमध्ये गंभीरचा समावेश असून हा खेळाडू सध्या रणजी ट्राॅफी खेळत आहे. यामुळे तो या दोन्ही गोष्टींचा ताळमेळ कसा घालतो हे पहावे लागेल.

गंभीर प्रमाणेच जो खेळाडू भारतीय संघाचे दरवाजे ठोठावत आहे तो सौराष्ट्राकडून सध्या रणजी खेळत असलेला राॅबीन उथप्पाही या संघात आहे. तो सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे.

यावेळी एक्स्ट्रा इनिंग पुर्णपणे वेगळी असणार अाहे. त्यात पॅनेलचे सदस्य हे सामन्यापुर्वीचे, सामन्यादरम्यानचे आणि सामना संपल्यानंतरचे विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करणार आहे.

वाचा महत्त्वाच्या बातम्या- 

एबी डिव्हिलियर्सच्या पुनरागमानाबद्दलच हे आहे मोठे वृत्त

Breaking- पहिल्या टी२० सामन्यासाठी टीम इंडियाच्या १२ खेळाडूंच्या नावाची घोषणा

वाढदिवस विशेष- कबड्डीतला धोनी: अनुप कुमार

तर आणि तरच टीम कोहलीकडून होणार तगडा विक्रम...

आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या हिटमॅन रोहित शर्माची अस्सल मराठी प्रतिक्रिया