अॅशेस २०१७-१८: दुसऱ्या कसोटीतही इंग्लंडची हाराकिरी, ऑस्ट्रेलियाची मालिकेत २-० अशी आघाडी

अॅडलेड । येथे सुरु असलेल्या अॅशेस मालीकेतील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा १२० धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

३५४ धावांच्या आव्हानासमोर काल चौथ्या दिवशी इंग्लंडची ४ बाद १७६ अशी अवस्था होती आणि सामना जिंकायची तरीही इंग्लंड संघाला संधी होती. कर्णधार जो रूट ६७ धावांवर नाबाद खेळत असल्यामुळे इंग्लंडकडून मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु त्यालाही काही विशेष आज करता आले नाही.

ख्रिस वोक्स (५), रूट(६७), मोईन अली(२), जॉनी ब्रेस्ट्रोवा(३६), क्रेग ओव्हरटन(७) आणि स्टुअर्ट ब्रॉड(८) यांच्या विकेट नियमित अंतराने गेल्या. जिमी अँडरसन नाबाद राहिला.

ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ५, जोश हेझलवूड २, नेथन लायन २ आणि पॅट कमिन्स १ यांनी विकेट्स घेतलया.

ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात १२६ आणि दुसऱ्या डावात १९ धावा करणाऱ्या शेन मार्शला सामनावीर घोषित करण्यात आले.

मालिकेतील तिसरा सामना १४ डिसेंबरपासून पर्थ येथे होणार आहे.

संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया – ८ बाद ४४२ घोषित व ५८ षटकांत सर्वबाद १३८
इंग्लंड- सर्वबाद २२७ व सर्वबाद २३३