पर्थ कसोटीसाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया

पर्थ। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात आजपासून दुसरा कसोटी सामना आॅप्टस स्टेडीयम पर्थ येथे सुरु झाला आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यात अंतिम 11 जणांच्या भारतीय संघात रोहित शर्माच्या ऐवजी हनुमा विहारी आणि आर अश्विनच्या ऐवजी उमेश यादवचा समावेश करण्यात आलेला आहे. रोहित आणि अश्विन दोघेही दुखापतीमुळे या कसोटी सामन्याला मुकले आहेत.

तसेच भारताने काल या कसोटीसाठी 13 जणांचा संघ घोषित केला होता. त्यातील भुवनेश्वर कुमार आणि रविंद्र जडेजा या दोघांना अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळालेली नाही.

आॅस्ट्रेलियाने अॅडलेड ओव्हलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीतील संघच दुसऱ्या कसोटीसाठीही कायम ठेवला आहे.

असे आहेत 11 जणांचे संघ-

भारत: विराट कोहली(कर्णधार), के एल राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), हानुमा विहारी, रिषभ पंत(यष्टिरक्षक), इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव.

आॅस्ट्रेलिया: अॅरॉन फिंच, मार्क्यूस हॅरिस, उस्मान ख्वाजा, शॉन मार्श, पिटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, टीम पेन(कर्णधार, यष्टीरक्षक) पॅट कमिंन्स, मिशेल स्टार्क, जोश हेझलवूड, नॅथन लिआॅन.

महत्त्वाच्या बातम्या:

आयपीएलमध्ये हे ३ खेळाडू खेळणार किंग्ज ११ पंजाबकडून

सर जडेजाचा १५ खेळाडूंमध्ये एकही बेस्ट फ्रेंड नाही तर…