- Advertisement -

ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला

0 385

गुवाहाटी । येथे आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी२० मालिकेतील दुसरा सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

बासपारा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी हे भारतातील ४९ वे मैदान बनणार आहे जेथे आंतरराष्ट्रीय सामना होणार आहे. भारताच नेतृत्व विराट कोहली करत आहे तर ऑस्ट्रेलियाचा नेतृत्व डेव्हिड वॉर्नर करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार स्टिव्ह स्मिथ खांद्याच्या दुखापतीमुळे मायदेशात परतला आहे.

या सामन्यात एमएस धोनी एक विशेष कामगिरी करू शकतो आहे ती म्हणजे भारतात टी२० मध्ये ५०० धावा करणारा धोनी दुसरा खेळाडू बनू शकतो.

तीन सामन्यांच्या या मालिकेत भारताकडे १-० अशी आघाडी आहे. जर भारत आजचा सामना जिंकून शकला तर वनडे मालिकेप्रमाणेच भारत टी२० मालिकाही खिशात घालेल.

भारत: रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), मनीष पांडे, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, यज्वेंद्र चहल, जसप्रित बूमरा.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल, ट्रॅव्हिस हेड, मोईसेस हेन्रिक्स, मोर्कस स्टोनीक्स, टिम पेन, नॅथन कॉल्टर-नील, अॅन्ड्रयू टाई, अॅडम झाम्पा, जेसन बेहेरेन्डॉरफ.

Comments
Loading...
%d bloggers like this: