पहा: जेव्हा ब्रेट ली कुस्तीमध्ये हरवतो भारतीय पहिलवानाला

ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली हा सध्या भारतात असून तो पहिलवानकी शिकत आहे. भारताचा पारंपरिक खेळ कुस्ती खेळतानाचा विडिओ सध्या स्टार स्पोर्ट्सच्या ट्विटर अकाउंटवरून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तामिळनाडू प्रीमियर लीग संपल्यानंतर क्रिकेट जगतात सध्या कर्नाटक प्रीमियर लीग अर्थात केपीएलची जोरदार चर्चा आहे. याच्या जाहिरातीसाठी या दिग्गज खेळाडूचा खास विडिओ शेअर करण्यात आला आहे.

यात ब्रेट ली प्रत्यक्ष आखाड्यात उतरून कुस्ती खेळताना दिसत आहे. यात त्याने निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला दिसतो. मैसूर येथे आखाड्यातील हा विडिओ शूट करण्यात आला असून त्यात त्याने एका पहिलवानाला हरवले देखील आहे.

ब्रेट ली यावेळी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरूनही काही फोटो शेअर केले आहेत.