१५ वर्षीय खेळाडूने रचला इतिहास; ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्या फेरीत; केले ३२ वर्षीय खेळाडूला पराभूत

मार्टा कॉस्ट्यूक या १५ वर्षीय खेळाडूने ऑस्ट्रेलियन ओपनची दुसरी फेरी गाठली आहे. अशी कामगिरी करणारी ती गेल्या २२ वर्षातील पहिली खेळाडू ठरली आहे.

१५वर्षीय मार्टा कॉस्ट्यूकने पात्रता फेरीतून आगेकूच करताना मुख्य फेरीत प्रवेश मिळवला होता आणि आज तिने मुख्य फेरीत आपला पहिला सामना जिंकला आहे.

तिने स्पर्धेत २५वे मानांकन मिळालेल्या पेंग शुअईला ६-२, ६-२ असे पराभूत केले.

मार्टा कॉस्ट्यूक ही युक्रेन देशाची असून चीनची पेंग शुअईने २०१४ची अमेरिकन ओपनमध्ये उपांत्यफेरीत प्रवेश केला होता. तिचे वय हे पेंग शुअईच्या अर्धेही नाही हे विशेष.

टूर दर्जाच्या स्पर्धेतील मार्टा कॉस्ट्यूकचा हा पहिलाच विजय आहे.

पेंग शुअई जेव्हा २००५मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन खेळली होती तेव्हा कॉस्ट्यूक फक्त २ वर्षांची होती. कॉस्ट्यूकला आता पुढच्या फेरीत ऑस्ट्रेलियाच्याच ऑलिविया रोगोवस्काचा सामना करावा लागणार आहे.

२०१६मध्ये मार्टा कॉस्ट्यूकने ह्याच स्पर्धेत कनिष्ठ गटाचे मुलींचे विजेतेपद जिंकले होते. ती सध्या जागतिक क्रमवारीत ५२१व्या स्थानावर आहे.