चेंडू छेडछाड प्रकरण ज्या खेळाडूमुळे घडले तो त्या दिवशी हाॅटेलमध्ये करत होता पार्टी

चेंडू छेडछाड प्रकरणानंतर अॉस्ट्रेलिया संघावर चाहत्यांचा आणि प्रायोजकांचा संताप वाढत चालला आहे. पण या गोष्टीचे गांभीर्य  अॉस्ट्रेलियाच्या उप-कर्णधार डेविड वॉर्नर राहिले नाही असे वाटते.

Foxsports.com.au मधील वृत्तानुसार, वॉर्नर त्या दिवसाचा सामना संपल्यावर संघाच्या हॉटेलमधील बारमध्ये क्रिकेटपटू नसणाऱ्या मित्रांसोबत पार्टी करत होता.

यामुळे त्याच्या संघ सहकाऱ्यांना त्याला हॉटेल मधून बाहेर काढायचे होते. तसेच त्याने आॅस्ट्रेलियन खेळाडूंचा व्हॉट्सअप ग्रुपही तेव्हा सोडला होता. 

सहकाऱ्यांनी वॉर्नरला असे सुध्दा बजावले होते की, जर त्याची वर्तवणुक अशीच राहिली तर संघातील संतापलेले खेळाडू आणि त्याच्यात वाद होऊ शकतो.

काही अॉस्ट्रेलियन खेळाडूंना चेंडू छेडखाणी प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यांनी कॅमेरॉन बॅनक्रोफ्टची ती प्रत्यक्ष कृती पहिल्यांदा मैदानावरील मोठ्या स्क्रिनवर बघितली.

काही रिपोर्टनुसार वॉर्नर हा या प्रकरणातील मुख्य सुत्रधार असण्याची शक्यता आहे. चेंडू छेडछाड ही सगळी कल्पना वॉर्नरची होती.  त्याला स्मिथने सहमती दर्शवली. याचमुळे स्मिथप्रमाणेच वॉर्नरला  सुध्दा चौथ्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे.

त्या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत स्मिथ म्हणाला होता, ” चेंडू सोबत छेडछाड करणे हे वॉर्नर आणि संघातील वरीष्ठ खेळीडूंनी तिसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या  दिवसाच्या दुपारच्या सत्रात ठरवले होते.”