कृणाल पंड्या आॅस्ट्रेलियात चमकला, केले हे खास विक्रम

सिडनी। आज(25 नोव्हेंबर) आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात तिसरा टी20 सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याने 36 धावांत 4 विकेट घेत खास विक्रम केले आहेत.

त्याने केलेल्या या कामगिरीमुळे आॅस्ट्रलियाचा डाव 20 षटकात 6 बाद 164 धावांवर रोखण्यात भारताला यश आले आहे. या सामन्यात आॅस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे.

या सामन्यात कृणाल पंड्याने केलेले हे खास विक्रम-

-या सामन्यातील कृणालची 36 धावांत 4 विकेट्स ही गोलंदाजीतील कामगिरी आॅस्ट्रेलियामध्ये टी20 सामन्यात भारतीय गोलंदाजाने केलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

विषेश म्हणजे 21 नोव्हेंबरला झालेल्या आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात कृणाल टी20मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध दिलेल्या या सर्वाधिक धावा देणारा भारतीय गोलंदाज ठरला होता.

-कृणाल आॅस्ट्रेलियामध्ये टी20 सामन्यात चार विकेट घेणारा पहिलाच भारतीय गोलंदाज.

-तसेच आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये चार विकेट घेणारा कृणाल आश्विननंतरचा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्विनने आॅस्ट्रेलिया विरुद्ध 2014 च्या टी20 विश्वचषकात ढाका येथे चार विकेट्स घेण्याची कामगिरी केली होती.

-कृणाल आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेणारा 13 वा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

यामध्ये भारताकडून सर्वाधिक वेळा आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 4 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम युजवेंद्र चहलच्या नावावर आहे. त्याने 3 वेळा अशी कामगिरी केली आहे. त्याच्या पाठोपाठ आर अश्विन आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 वेळा हा पराक्रम केला आहे. अन्य 10 गोलंदाजांनी प्रत्येकी एकवेळा अशी कामगिरी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

महिला टी20 विश्वचषक: आॅस्ट्रेलियाच्या महिलांनी कोरले चौथ्यांदा टी20 विश्वचषकावर नाव

भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार: भाग १५- दुर्दम्य इच्छाशक्तीचा ‘बाला-ली’

प्रो कबड्डीच्या सहाव्या मोसमात असा मोठा पराक्रम करणारा सिद्धार्थ देसाई ठरला पहिला खेळाडू