तिसरी कसोटी: अक्सर पटेल करणार कसोटी पदार्पण !

पल्लिकेल: डावखुरा फिरकी गोलंदाज अक्सर पटेल हा शनिवारी श्रीलंकेविरुद्ध कसोटी पदार्पण केले आहे. तो रवींद्र जडेजाच्या जागी भारतीय संघात खेळेल.

आयसीसीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे जडेजाला तिसऱ्या कसोटीला मुकावे लागणार आहे.

अक्सर पटेल सध्या दक्षिण आफ्रिकेत भारत अ कडून तिरंगी मालिकेत खेळत आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाने अक्सर पटेलला आफ्रिकेतून ताबडतोब श्रीलंकेत बोलवून घेतले आहे. अक्सरने सध्या सुरु असलेल्या तिरंगी मालिकेत चांगली कामगिरी करताना १५.५० च्या सरासरीने ६ विकेट्स घेतल्या आहेत. तो आज होणार दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धचा सामना खेळून लंकेला रवाना होईल.

अक्सर पटेल भारताकडून ३० एकदिवसीय सामने आणि ७ टी२० सामने खेळला आहे. त्याने भारताकडून २९ ऑक्टोबर रोजी विझाग येथे शेवटचा सामना खेळला आहे.