आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत विबग्योर स्कुल अ संघाला विजेतेपद

पुणे |  ग्रीनबॉक्स यांच्या तर्फे आयोजित ग्रीनबॉक्स आंतरशालेय 12वर्षाखालील फुटबॉल 2018 स्पर्धेत   विबग्योर स्कुल अ संघाने बिशप्स स्कुल कॅम्प संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
कॅस्टल रॉयल, एबीआयएल कॅम्पस, रेंजहिल्स, भोसलेनगर येथील फुटबॉल मैदानावर पार पडलेल्या  या स्पर्धेत अंतिम सामन्यात  आयुष खतनहारच्या अफलातून हॉट्रिक कामगिराच्या जोरावर  विबग्योर स्कुल अ संघाने  बिशप्स स्कुल कॅम्प संघाचा 5-0 असा दणदणीत पराभव करत विजेतेपद पटकावले.  अरहव जोधवानी याने 13 व 16व्या मिनिटाला गोल करत संघाला मोठ्या विजयासह विजेतेपद मिळवून दिले.
स्पर्धेतील विजेत्या विबग्योर स्कुल अ संघाला करंडक पारितोषिक देण्यात आला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ग्रीनबॉक्सचे सौरभ हेबळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
विबग्योर स्कुल अ: 5( आयुष खतनहार 12,14,16मि, अरहव जोधवानी 13, 16मि.)वि.वि.बिशप्स स्कुल कॅम्प:0.