असा ‘कहर’ रनआऊट तूम्ही क्रिकेटच्या इतिहासात पाहिला नसेल!

आबु धाबी | पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक विचित्र रनआऊट पहायला मिळाला. हा रनआऊट पाकिस्तानचा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज अझर अली सोबत घडला.

त्याचे झाले असे की ५३व्या षटकातील पीटर तिसऱ्या चेंडूवर अझर अलीने चेंडू सीमारेषेकडे मारला. अझर अली आणि दुसऱ्या बाजूला असलेल्या असाद शफिकला वाटले की चेंडूने सीमारेषा पार केली. त्यामुळे सुरुवातील ते जी धाव घेण्यासाठी धावले होते ती पुर्ण न करता एकमेकांशी चर्चा करत राहिले.

त्याचवेळी सीमारेषेवरुन मिचेल स्टार्कने चेंडू सरळ यष्टीरक्षक टीम पेनकडे दिला. पेनने क्षणाचाही विलंब न लावता अझर अलीला धावबाद केले.

यावेळी आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी एकच जल्लोश केला. नक्की काय घडले याची अझर अली आणि असाद शफिकला पुसटसीही कल्पना नव्हती.

जेव्हा काय झाले समजले तेव्हा अझऱ अलीने पॅव्हिलीयनचा रस्ता पकडला होता. क्रिकेटमध्ये एकदा का चेंडू सीमारेषेपार गेला की त्यानंतर त्यावर पुढचा चेंडू पुर्ण होईपर्यंत धावबाद करता येत नाही. यामुळे पाकिस्तानचे हे दोन्ही खेळाडू चौकार गेल्याच्या भ्रमात निवांत होते. परंतु याची मोठी किंमत पाकिस्तानला मोजावी लागली.

अझर अली हा चांगला खेळत होता. त्याने १४१ चेंडूत ६४ धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या:

कसोटी पदार्पणातच १८ विकेट्स घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा आज ५०वा वाढदिवस

पृथ्वी शाॅ- श्रेयस अय्यरच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबई विजय हजारे ट्राॅफीच्या अंतिम फेरीत

सचिन, धोनी प्रमाणेच कोहली करणार मायदेशात हा मोठा पराक्रम

पृथ्वी शॉला मिळू शकते रोहित शर्माबरोबर वनडेमध्ये फलंदाजी करण्याची संधी

सचिनचा हा ‘विराट’ रेकॉर्ड मोडण्याची कोहलीला संधी