बर्थडेच्या दिवशीच पाकिस्तानच्या खेळाडूने मोडला विराटचा विक्रम

रविवारी रात्री पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड संघात पार पडलेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात पाकिस्तानने 47 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच न्यूझीलंडला 3 सामन्यांच्या टी20 मालिकेत पाकिस्तानने व्हाइटवॉशही दिला आहे.

या सामन्यात पाकिस्तानकडून बाबर आझमने सर्वाधिक 79 धावा करताना एक विश्वविक्रमही रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये जलद एक हजार धावा करण्याचा विक्रम केला आहे.

24 वर्षीय बाबर आझमने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 26 व्या डावात एक हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा विक्रम करताना त्याने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 27 डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

आझमने आत्तापर्यंत 26 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात खेळताना 8 अर्धशतकांसह 54.26 च्या सरासरीने 1031 धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वात जलद एक हजार धावा करणारे खेळाडू (डावांनुसार):

26 – बाबर आझम

27 – विराट कोहली

29 – अॅरॉन फिंच

महत्त्वाच्या बातम्या:

भारतीय साॅफ्टवेअर इंजिनीअर झाला अमेरिकेच्या क्रिकेट संघाचा कर्णधार

तिशी पुर्ण करताना विराट-सचिनने केलेल्या पराक्रमांचा तुलनात्मक आढावा

मॅच फिक्सिंगमध्ये आडकलेल्या खेळाडूला बेल वाजवण्याचा मान दिल्याने गौतम गंभीर नाराज

Video: एमएस धोनीने विराटला दिलेल्या बर्थडेच्या शुभेच्छा नक्की पहा