पहिली कसोटी: शिखर धवन पाठोपाठ पुजाराचेही शतक

भारतीय संघाची नवीन भिंत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराने आज श्रीलंकेविरुद्ध दणदणीत शतक केले. पुजाराचे हे ४९ कसोटीमध्ये १२ वे शतक आहे.

या शतकी खेळीमध्ये पुजाऱ्याने ८ चौकार मारले असून ही खेळी सजविण्यासाठी पुजाराला १६८ चेंडूंचा सामना करावा लागला. आज १९० धावांवर बाद झालेल्या शिखर धवनला पुजाऱ्याने जबदस्त साथ देत २५३ धावांची भागीदारी केली.

फर्स्ट क्लास क्रिकेटमधील पुजाराची ही ४०वी शतकी खेळी असून ५० वी शतकी खेळी ही व्यावसायिक क्रिकेटमधील आहे.