पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आर्यन स्कायलार्कस संघाचा सलग दुसरा विजय

पुणे ।पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आर्यन स्कायलार्कस या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करत सलग दूसरा विजय मिळवला

पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात अंकुश जाधव(नाबाद 59धावा)याने केलेल्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर आर्यन स्कायलार्कस संघाने गुडलक हॉग्स लिमये संघावर 13धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना आर्यन स्कायलार्कस संघाने एकही गडी न गमावता 6षटकात बिनबाद 108धावा केल्या.

यात अंकुश जाधवने 20चेंडूत 4चौकार, 5षटकारांच्या मदतीने नाबाद 59धावा, तर जयदीप गोडबोलेने 16चेंडूत 5चौकार, 3षटकारांच्या मदतीने नाबाद 46धावा केल्या. याच्या उत्तरात गुडलक हॉग्स लिमये संघाला 6षटकात 1बाद 95धावाच करता आल्या. यात समीर जोगच्या नाबाद 41धावा,देवेंद्र चितळेच्या 48धावांची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.आर्यन स्कायलार्कसकडून सोहन आंगळे 11धावात 1 गडी बाद केला. सामन्याचा मानकरी अंकुश जाधव ठरला.

रवी कासट(नाबाद 28धावा व 1-10)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ट्रूस्पेस जॅगवॉर्स संघाने गोखले सिनर्जी कोब्राजचा 6गडी राखून पराभव केला. श्रीनिवास चाफळकरच्या उपयुक्त 43धावांच्या खेळीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने गोल्डफिल्ड डॉल्फिन्सवर 11धावांनी विजय मिळवला. अंजनेया साठे( 10धावा व 1-3)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अंजनेया ब्रेव बिअर्स संघाने सुपर लायन्सवर 6गडी राखून विजय मिळवला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
आर्यन स्कायलार्कस: 6षटकात बिनबाद 108धावा(जयदीप गोडबोले नाबाद 46(16, 5×4, 3×6), अंकुश जाधव नाबाद 59(20, 4×4, 5×6))वि.वि.गुडलक हॉग्स लिमये: 6षटकात 1बाद 95धावा(समीर जोग नाबाद 41(18, 2×4,4×6 ),देवेंद्र चितळे 48(15, 3×4, 3×6),सोहन आंगळे 1-11);सामनावीर-अंकुश जाधव; आर्यन स्कायलार्कस 13धावांनी विजयी;

गोखले सिनर्जी कोब्राज: 6षटकात 4बाद 55धावा(विमल हंसराज 16(10), विक्रांत पाटील नाबाद 17(9,2×6), रवी कासट 1-10)पराभूत वि.ट्रूस्पेस जॅगवॉर्स: 5.4षटकात 2बाद 56धावा(रवी कासट नाबाद 28(18,4×4), नकुल पटेल 11(10,1×4), विमल हंसराज 1-8, योगेश भोनले 1-9);सामनावीर-रवी कासट; ट्रूस्पेस जॅगवॉर्स 6गडी राखून विजय;

ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 3बाद 90धावा(श्रीनिवास चाफळकर 43(17,5×6), हर्षल गंद्रे 33(11,1×4,4×6), अनिल छाजेड 2-15, नचिकेत जोशी 1-26) वि.वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन्स: 6षटकात 4बाद 79धावा(रोहन छाजेड 37(16,7×4), अश्विन शहा 29(13,1×4, 3×6), श्रीनिवास चाफळकर 1-2, करण बापट 1-8);सामनावीर- श्रीनिवास चाफळकर; ओव्हन फ्रेश टस्कर्स 11धावांनी विजयी;

सुपर लायन्स: 6षटकात 5बाद 62धावा(कल्पक पत्की 27(13,3×4,1×6), पियुश शर्मा 2-7, प्रशांत वैद्य 1-5, प्रसाद जाधव 1-7, अनुज लोहाडे 1-8)वि.वि.एनएच वुल्वस: 6षटकात 4बाद 46धावा(प्रसाद जाधव नाबाद 28(15,1×4,2×6), सुधांशू मेडसीकर नाबाद 12(10, 1×6), अभिजित राजवाडे 2-3, कल्पक पत्की 1-18, आशिष राठी 1-6);सामनावीर-अभिजित राजवाडे; सुपर लायन्स 16धावांनी विजयी.

सुपर लायन्स: 6षटकात 3बाद 61धावा(आशिष राठी नाबाद 25(19,1×4, 1×6), रणाक्यु झवर 22(10,1×4,2×6), अंजनेया साठे 1-3, पिनाकिन मराठे 1-10, सौरभ चिंचनकर 1-10)पराभूत वि. अंजनेया ब्रेव बिअर्स: 5.3षटकात 2बाद 65धावा(गिरीश मजुमदार नाबाद 19(7,1×4, 2×6), गौरव सावगावकर 19(14,2×4), अंजनेया साठे 10, शिवकुमार जावडेकर नाबाद 10, अभिजित राजवाडे 1-7, आशिष राठी 1-7);समानवीर-अंजनेया साठे; अंजनेया ब्रेव बिअर्स 6गडी राखून विजयी.