महाराष्ट्र किशोर (मुले) कबड्डी संघाच्या प्रशिक्षक पदी बजरंग परदेशी

भारतीय हौशी कबड्डी महासंघ व बिहार राज्य कबड्डी असोसिएशनच्या वतीने ३० वी किशोर-किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा दि. २१ जानेवारी ते २४ जानेवारी २०१९ या कालावधीत पाटलीपुत्र पाटणा, बिहार येथे आयोजित करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र किशोर गट (मूले) संघाच्या प्रशिक्षकपदी बजरंग परदेशी यांची महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन कडून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या सौजन्याने दि. १५ जानेवारी रोजी शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे खेळाडूंची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

बजरंग परदेशी हे राष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी शालेय राष्ट्रीय स्पर्धा व अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत खेळले आहेत. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत विदर्भ संघाचे हे प्रतिनिधीत्व केलं आहे