वाचा: कोणत्या दिग्गजांनी केले बांगलादेश संघाच्या कामगिरीचे कौतुक

एक अशी कामगिरी ज्यामुळे बांगलादेश संघावर सर्वच स्थरातून कौतुकाचा वर्षाव होत. जगातील एक दिग्गज कसोटी खेळणारा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलिया संघाला बांगलादेशने रोमहर्षक सामन्यात २० धावांनी पराभवाची धूळ चारली.

ऑस्टेलिया संघात मोठ्या खेळाडूंचा भरणा असूनही फक्त सांघिक खेळाच्या जोरावर बांगलादेश संघाने या संघाला चारीमुंड्या चिट केले. त्यामुळे क्रिकेटमधील दिग्गजांच्या कौतुकाला हा संघ खऱ्या अर्थाने पात्र ठरला.

मुरली विजय, परवेज महारुफ, मोहमंद शमी, मायकल क्लार्क, माहेला जयवर्धने, आकाश चोप्रा, वीरेंद्र सेहवाग, रसेल अरनॉल्ड या खेळाडूंनी या संघाच्या कामगिरीचे कौतुक केले.