योगाचार्य होण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू सोडणार होता क्रिकेट

मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेतील चेंडू छेडछाड प्रकरण चांगलेच गाजले होते. या प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एक वर्षांची बंदीही घालण्यात आली आहे. तसेच कॅमेरॉन बॅनक्रॉफ्टवर 9 महिन्याची बंदी घालण्यात आली आहे.

बॅनक्रॉफ्टवरील ही बंदी 30 डिसेंबरला उठणार आहे. हे प्रकरण झाल्यानंतर बॅनक्रॉफ्टने तो पूर्णपणे बदलला असल्याचे सांगितले आहे. तसेच  क्रिकेट सोडून योग प्रशिक्षक बनण्याचा विचारही त्याने केला होता, असे देखील सांगितले आहे.

या प्रकरणाबद्दल बॅनक्रॉफ्टने या 9 महिन्यात पहिल्यांदा त्याचे मौन सोडले आहे. त्याने या चेंडू छेडछाड प्रकरणानंतर स्वत:लाच पत्र लिहिले आहे. हे पत्र वेस्ट आॅस्ट्रेलिया वृत्तपत्रात छापण्यात आले आहे. या पत्रात त्याचा भावनिक प्रवासाचे वर्णन करण्यात आले आहे.

बॅनक्रॉफ्टने यात म्हटले आहे की ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर आणि वेस्ट ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक अॅ़म वोजेस यांचा त्याच्यावर मोठा प्रभाव आहे.

बॅनक्रॉफ्टने सांगितले आहे की त्याची महत्त्वाच्या वेळी ब्रिस्बेनची वेस्टर्न ऑस्ट्रेलियाची प्री सिजन ट्रीप मुकली. त्यामुळे त्याला वाटले की तो आता कधीही क्रिकेट खेळू शकणार नाही.

त्याने पत्रात म्हटले आहे की, ‘जोपर्यंत तूला कळत नाही की तू कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट आहेस, तो व्यक्ती जो व्यावसायिक क्रिकेट खेळतो की तो कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट जो क्रिकेटपटू नाही, तोपर्यंत तू पुढे जाऊ शकत नाही. हा क्षण तूझ्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहे.’

‘तू शरिर रचना शिकला आहेस, तूला त्याचे प्रकार, तत्त्वज्ञान शिकवता येतात. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू तूझ्या आयुष्याचा चांगल्या उद्देशाने उपयोग करु शकतो.’

तसेच तो पुढे म्हटला आहे की ‘कदाचित क्रिकेट तूझ्यासाठी नाही. तू स्वत:ला विचार तूला परत यायचे आहे का? योगामुळे तूला संतुष्टी मिळते. हे वास्तव अस्तित्वात आहे असे वाटणेही कठीण आहे.’

तसेच त्याने त्याच्या पत्रात असेही म्हटले आहे की योगामधून तो लोकांना प्रेरणा देऊ शकतो. पण यानंतर प्रीमियर क्रिकेटमधील विलेटन डिस्ट्रीक्ट क्रिकेट क्लबमध्ये खेळताना त्याचे क्रिकेटचे प्रेम पुन्हा वाढले आहे.

याबद्दल तो म्हणाला, ‘तू निळी टोपी घातली, ती हिरवी (आॅस्ट्रेलियाची राष्ट्रीय संघची कॅप) नव्हती. पण तूला या खेळातून मिळणारा आनंद सारखाच आहे. तूझे या खेळावर प्रेम आहे. तू जो आहेस त्याचा क्रिकेट हा महत्त्वाचा भाग आहे. ‘

महत्त्वाच्या बातम्या:

या व्यक्तीच ऐकलं तर अश्विन येऊ शकतो तिसऱ्या कसोटीत ओपनिंगला

मेस्सी-रोनाल्डो यांच्यात २०१८ मध्ये सर्वाधिक गोल करण्यासाठी चुरस

२०१९ चा विश्वचषक जिंकला तर कर्णधार कोहलीला करावे लागेल गांगुलीचे हे भन्नाट चॅलेंज पूर्ण