बंड्या मारुती व गोल्फादेवी मुंबई शहरच्या दोन्ही संघ उजाळा क्रीडा मंडळाच्या स्पर्धेत अंतिम फेरीत.

बंड्या मारुती, गोल्फादेवी या दोन मुंबई शहराच्या संघांनी उजाला क्रीडा मंडळ आयोजित पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक. या स्पर्धेत आज श्रीराम विरुद्ध बंड्या मारुती, जय शिव विरुद्ध गोल्फादेवी अशा उपांत्य लढती झाल्या.

महाराष्ट्र राज्य कबड्डी असो; ठाणे जिल्हा कबड्डी असो.यांच्या मान्यतेने भिवंडी येथील तलाव गार्डन मैदानावर सुरू असलेल्या स्पर्धेत आज उपांत्य फेरीचे सामने पार पडले. आज यास्पर्धेला प्रो कबड्डी रेफरी जितेश शिरवाडकर यांनी उपस्थिती लावली होती.

श्री राम पालघर विरुद्ध बंड्या मारुती यांच्यात झालेल्या उपांत्य सामन्यात बंड्या मारुती संघाने ४१-१७ असा पालघर संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक दिली. चढाईत महेश आत्माकर, तर पकडी मध्ये मंगेश घुंगरे यांनी चांगला खेळ केला.

जय शिव बदलापूर विरुद्ध गोल्फदेवी सेवा मंडळ मुंबई शहर यांच्यात झालेला दुसऱ्या उपांत्य सामना ३८-१७ असा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. अक्षय भिडू, सिद्धेश पिंगळे यांनी विजयात मोलाची भूमिका बजावली.