बंगलोर घेणार का अंतिम सामन्याचा सूड…??

हैद्राबादच्या संघाने डेविड वॉर्नरच्या नेतृत्वखाली मागील वर्षी बंगलोरच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर अंतिम सामन्यात नमवून २०१६ च्या आयपीलच्या चषकावर आपले नाव कोरले. आयपीलच्या नवव्या पर्वाचा शेवट हा या धमाकेदार सामन्याने झाला होता आणि आता दहाव्या पर्वाची  सुरवात पण हे दोनच संघ करत आहेत,  हा सामना ५  एप्रिलला संध्याकाळी होईल.

मागील वर्षी विराट कोहलीने आपल्या आयुष्यतील सर्वोत्तम फलंदाजी करत बंगलोर संघाला अंतिम सामन्यापर्यंत न्हेले. विराटने ४ शतकांसह ९७३ धावा केल्या या आजपर्यंतच्या आयपीलमधील एका पर्वातील सर्वाधिक धाव होत्या. विराट कोहलीला साथ देताना युझ्वेंद्र चाहलने १३ सामन्यत ८ च्या इकॉनॉमिने २१ बाळी घेतले होते. सर्वाना असेच वाटत होते की २०१६ चे आयपीएल बंगलोरच जिंकणार पण त्याच वेळीस लढत होती ती म्हणजे बंगलोरचे फलंदाज आणि हैदराबादचे गोलंदाज यांच्यामध्ये. अंतिम सामान्यमध्ये ऑस्ट्रेलियाच्या बेन कटिंगने अष्टपैलू खेळ दाखून हैद्राबादला सामना आणि चषक जिंकून दिला .

आता २०१७च्या आयपीलची सुरुवात याच सामन्याने होणार आहे. अंतिम सामना हा बंगलोरमध्ये पार पडला होता पण यावर्षीचा पहिला सामना हा हैदराबादमध्ये होणार आहे,  आता क्रिकेट रसिकांना या गोष्टीची उत्सुकता लागली आहे की बंगलोर सूड घेणार का हैदराबाद आपला दबदबा कायम ठेवणार?