तब्बल ११८षटके गोलंदाजी केल्यावर त्या संघाच्या गोलंदाजांना मिळाली पहिली विकेट

0 94

दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना ११८ व्या षटकांत पहिला बळी मिळाला. दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश यांच्यात पहिला कसोटी सामना सुरु आहे.

या सामन्यात बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलीच कसरत करावी लागली. त्यांना पहिला बळी घेण्यासाठी ११८ व्या षटकापर्यंत वाट बघावी लागली.

बांगलादेशला धावबादच्या रूपात एदेन मार्क्रमचा बळी मिळाला होता. परंतु त्यांच्या गोलंदाजांना दक्षिण आफ्रिकेचा एकही फलंदाज बाद करता येत नव्हता. अखेर ११७.३ व्या षटकांत शफीउल इस्लामने हाशिम अमलाला बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा दुसरा फलंदाज बाद झाला.

या सामन्यात हाशिम अमलाने त्याचे २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक शतकाच्या यादीत आता अमला दुसऱ्या क्रमांकावर आला आहे तसेच त्याने ग्रॅमी स्मिथची बरोबरी केली आहे. या यादीत अजूनही जॅक कॅलिस ४५ शतकांसह अव्वल आहे.

संक्षिप्त धावफलक:

दक्षिण आफ्रिका: ४९६/३ (१४६ षटके) घोषित

डीन एल्गार:१९९ धावा (बाद) (३८८ चेंडू)

एदेन मार्क्रम:९७ धावा (धावबाद) (१५२चेंडू)

हाशिम अमला: १३७ धावा (बाद) (२००चेंडू)

बांगलादेश: १०३/२ ( २५.५ षटके)

मोमिनूल-हक़: २६ धावांवर नाबाद

तमिम इक़्बल: ० धावांवर नाबाद

Comments
Loading...
%d bloggers like this: