विश्वचषकामध्ये बांगालादेश हिरव्या जर्सीबरोबरच या नवीन जर्सीतही दिसणार खेळताना

30 मेपासून आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2019 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी बांगलादेश संघाने त्यांच्या दुसऱ्या जर्सीचे अनावरण केले आहे. त्यामुळे नियमित जर्सी व्यतिरिक्त बाहेरच्या सामन्यांसाठी दुसऱ्या जर्सीचे अनावरण करणारा बांगलादेश पहिला संघ ठरला आहे.

दुसऱ्या जर्सीचे अनावरण करण्यामागील कारण असे की काही दिवसांपूर्वी आयसीसीने जर्सीबद्दल एक नवीन निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार प्रत्येक संघ या विश्वचषकात घरचे आणि बाहरचे या पद्धतीने सामने खेळणार आहेत. त्यामुळे यजमान इंग्लंड व्यतिरिक्त अन्य संघ घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी दोन वेगवेगळ्या जर्सीमध्ये खेळणार आहेत. या कारणामुळे संघांना आपल्या नियमित जर्सी व्यतिरिक्त आता बाहेरच्या सामन्यांसाठी नवीन जर्सीचेही अनावरण करावे लागणार आहे.

हा निर्णय आयसीसीने फुटबॉल प्रमाणे क्रिकेटला अधिक रोमांचकारी बनवण्याच्या दृष्टीने घेतला आहे. फुटबॉलमध्ये घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी वेगवेगळी जर्सी असते.

त्याचबरोबर विश्वचषकात सहभागी होणाऱ्या संघांपैकी इंग्लंड, भारत, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांची पहिली जर्सी ही निळ्या रंगछटेतील आहे. तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांची पहिली जर्सी हिरव्या रंग छटेतील आहेत.

यामुळे एकच रंगसंगती असल्याने गोंधळ होऊ नये म्हणून आयसीसीने घरच्या आणि बाहेरच्या सामन्यांसाठी वेगवेगळ्या जर्सीचा नियम लागू केला आहे.

बांगालदेशने आनावरण केलेल्या नवीन जर्सीचा रंग पूर्ण लाल असून मधे हिरव्या रंगाची पट्टी आहे. यावर बांगलादेश असे इंग्लिंशमध्ये पांढऱ्या अक्षरात मोठे नाव लिहिलेले आहे. या जर्सीमधील फोटो बांगलादेशचे क्रिकेटपटू तमिम इक्बाल आणि मुस्तफिजूर रेहमानने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

तसेच काही रिपोर्ट्सनुसार भारतीय संघही त्यांच्या दुसऱ्या जर्सीचे अनावरण करण्याची तयारी करत आहे. भारताची दुसरी जर्सी नारंगी रंगछटेतील असेल. त्याचबरोबर भारताला इंग्लंड, अफगाणिस्थान आणि श्रीलंका यांच्या विरुद्धच्या सामन्यांसाठी दुसऱ्या जर्सीची गरज लागणार आहे. कारण या संघांची नियमित जर्सी देखील निळ्या रंगछटेतील आहे.

याचबरोबर इंग्लंड यजमान असल्याने तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची जर्सी अन्य सर्व संघांच्या जर्सीच्या रंगापेक्षा वेगळी असल्याने त्यांना दुसऱ्या जर्सीची गरज नाही.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या सराव सामन्यात यष्टीरक्षक नाही तर क्षेत्रकक्षक झाला धोनी, पहा व्हिडिओ

प्रेक्षकांनी उडवलेल्या खिल्लीबद्दल शतकवीर स्टिव्ह स्मिथ म्हणाला…

काय सांगता! चक्क इंग्लंडचा प्रशिक्षकच खेळाडू म्हणून उतरला मैदानात