- Advertisement -

बांगलादेशने रचला इतिहास! ऑस्ट्रेलियाला प्रथमच चारली पराभवाची धूळ!

0 67

गेल्या २४ तासात क्रिकेट जगतात खळबळजनक असे कसोटी सामने पाहायला मिळाले आहे. काल दुबळ्या समजल्या जाणाऱ्या विंडीज संघाने ५ विकेट्सने यजमान इंग्लंड संघावर तब्बल १७ वर्षांनी विजय मिळवला तर आज शेरे ए बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका येथे झालेल्या बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा २० धावांनी पराभव केला.

आजपर्यंत या दोन देशात ५ कसोटी सामने झाले असून पहिल्या ४ सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा पराभव केला आहे. २ कसोटी सामन्यांच्या या मालिकेत बांगलादेशने १-० अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेश संघाला पहिल्या डावात ४३ धावांची आघाडी मिळाली होती. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव २२१ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे चौथ्या डावात ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी २६५ धावांची गरज होती. कालचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलिया ३० षटकांत २ बाद १०९ धावांवर खेळत होती. काल ७५ धावांवर नाबाद असणाऱ्या डेविड वॉर्नरने आज शतकी खेळी केली. तर काल २५ धावांवर खेळत असलेला स्मिथ १२ धावांची भर घालून बाद झाला.

बाकी फलंदाजांना विशेष चमक दाखवता आली नाही. पीटर हॅन्ड्सकॉम (१५), ग्लेन मॅक्सवेल(१४), मॅथवे वेड(४), ऍशटन एजर(२), नॅथन लायन(१२) आणि जोस हेझलवूड (०) हे फलदांज बाद झाले. पॅट कमिन्स ३३ धावांवर नाबाद राहिला.

बांगलादेशकडून सर्वोत्तम गोलंदाजी करताना शाकिब उल हसन (८५-५), मेहदी हसन(६०-३) तिजुल इस्लाम(८०-२) यांनी विकेट्स घेतल्या.

 

Comments
Loading...
%d bloggers like this: