काय सांगता! त्या कारणामुळे हॅकर्सने केली कर्णधार कोहलीची वेबसाईट हॅक

मुंबई | भारत आणि विंडीज यांच्यातला पहिला कसोटी सामना 4 आॅक्टोबरपासून राजकोट येथे सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची वेब साइट हॅक करण्यात आली आहे.

साइबर सेक्युरिटी अॅन्ड इंटेलिजन्स या बांगलादेश स्थित हॅकरच्या ग्रुपने ती मंगळवारी हॅक केली आहे.

विराटची वेब साइट हॅक करण्यामागील मुख्य उद्देश अंतिम सामन्यातील शतकवीर लिंटन दासची विकेट आहे. त्याची विकेट गेल्याचे स्पष्ट झालेले नसतानाही त्याला बाद ठरवण्यात आले होते.

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर धोनीने लिंटन दासला यष्टीचीत पकडले. त्यावर थर्ड अंपायर राॅड टकर यांनी लिंटन दास बाद झाल्याचे घोषित केले. मात्र लिंटन दास लाईनच्या बाहेर आहे  हे स्पष्ट होत नव्हते. भारतीय संघाने विराटच्या अनुपस्थितीत एशिया कप स्पर्धा जिंकली.

हॅकरने विराटची गॅलरी हॅक केली व त्यात संदेश लिहीला. ”प्रिय आयसीसी, तुम्ही क्रिकेटचा जेन्टलमन्स गेम म्हणून वापर करायला पाहिजे होता. प्रत्येक संघाला बरोबरीचा दर्जा द्यायला पाहिजे होता. तो कसा बाद आहे सांगा? तुम्ही अधिकृतपणे माफी मागायला हवी होती. त्याचबरोबर अंपायरवर कारवाई करायला हवी होती. ते तुम्ही केले नाही. आता तुमची साइट हॅक होणार आहे. तुम्ही ती पुनरस्थापित करायला सावध रहा,” असा संदेश लिहीला आहे.

लिंटन दासची ती विकेट बांगलादेशला खुप महागात पडली होती. त्यांनतर बांगलादेशचा डाव 222 धावांवर गडगडला होता.

महत्वाच्या बातम्या-