बेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ !

आज रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स आणि प्रदीप नरवालच्या पटना पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाची १७ वी लढत होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार अफलातून फॉर्ममध्ये आहे. तिसऱ्या मोसमात जेव्हा पटना पायरेट्सने पहिल्यांदा प्रो कबड्डीचा किताब जिंकला होता तेव्हा हे दोन्ही रेडर्स पटनाच्याच संघात होते.

मागील तिन्ही सामन्यात रोहितने सुपर १० लगावले आहेत पण त्याला त्याच्या बाकी रेडर्सकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्याच बरोबर मागील सामन्यात त्याचा डिफेन्समध्ये अनुभवी रवींद्र पहलची कमतरता दिसून येत होती.

तर दुसऱ्या बाजूला, पटना पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने २ सामन्यात २७ मिळवले आहेत तर आज त्याला सुपर १० ची हॅट्रिक करण्याची ही संधी आहे. विशाल माने आणि सचिन शिंगाडे यांनीही डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली आहे.

 

संभाव्य संघ:

पटना पायरेट्स

१. परदीप नरवाल
२. मोनू गोयोत
३. विनोद कुमार
४. विशाल माने
५. जयदीप
६. सचिन शिंगेडे
७. सतीश

 

बेंगलुरू बुल्स

१. रोहित कुमार
२.अजय कुमार
३. गुरविंदर सिंग
४. अंकित सांगवान
५. रविंदर पहल
६. प्रितम चिल्लर
७. संजय श्रेष्ठ