पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत वैष्णवी सिंग, आस्मि आडकर, अर्णव बनसोडे, साईराज साळुंखे यांची विजयी सलामी

पुणे। पुणे महानगर पालिका यांच्या तर्फे व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली पहिल्या पुणे महापौर चषक लॉन टेनिस स्पर्धेत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात वैष्णवी सिंग, आस्मि आडकर, गायत्री मिश्रा यांनी तर, मुलांच्या गटात अर्णव बनसोडे, साईराज साळुंखे, तेज ओक या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलींच्या गटात वैष्णवी सिंग व आस्मि आडकर यांनी अनुक्रमे अनन्या ओरुगन्ती व हर्षदा तांबोळी यांचा 5-0अशा सारख्याच फरकाने पराभव करून आगेकूच केली. गायत्री मिश्राने धायना भंडारीवर 5-1असा विजय मिळवला.

मुलांच्या गटात सोळाव्या मानांकित साईराज साळुंखेने विश्व जोंधळेला 5-2असे नमविले. नवव्या मानांकित तेज ओक याने मिहीर केळकरचा 5-0 असा तर, पाचव्या मानांकित अर्णव बनसोडेने अंकित रायचा टायब्रेकमध्ये 5-4(4)असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 12 वर्षाखालील मुली:

अंजली निंबाळकर वि.वि.रिदा शेख 5-1;

गायत्री मिश्रा वि.वि.धायना भंडारी 5-1;

आस्मि आडकर वि.वि.हर्षदा तांबोळी 5-0;

सारा खंदळगावकर वि.वि.ख़ुशी पाटील 5-4(4);

डेलिशा रामघट्टा वि.वि.जुही चौधरी 5-2;

वैष्णवी सिंग वि.वि.अनन्या ओरुगन्ती 5-0;

12 वर्षाखालील मुले:

आदित्य पटेल वि.वि.जश शहा 5-4(3);

साईराज साळुंखे(16) वि.वि.विश्व जोंधळे 5-2;

तेज ओक(9) वि.वि.मिहीर केळकर 5-0;

अर्णव बनसोडे(5) वि.वि.अंकित राय 5-4(4);

अभिनित शर्मा(8) वि.वि.शिवम पाडिया 5-1;

अभिराम निलाखे(4) वि.वि.साई पृभव 5-0.