बारामतीत होणार १४ वर्षा खालील राज्यस्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा

– अनिल भोईर

क्रीडा व युवक सेवा, संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व स्पोर्ट्स अकॅडमी बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय १४ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धा २०१८-१९ चे आयोजन बारामती येथे करण्यात आले आहे. यास्पर्धेचे उद्घाटन १६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५:३० वाजता अध्यक्षा हायटेक टेक्सस्टाईलच्या मा. सौ सुनेत्रा वहिनी पवार व खाजदार मा. सौ सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला अनेक राजकीय व क्रीडाक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्याचं बरोबर आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या महिला खेळाडू सोनाली शिंगटे व सायली केरिपाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राज्यस्तरीय शालेय १४ वर्ष मुले/मुली कबड्डी स्पर्धेविषयी सर्व काही:

स्पर्धेत सहभागी संघ- यास्पर्धेसाठी राज्यातून मुंबई, पुणे, अमरावती, नागपूर, नाशिक, लातूर, औरंगाबाद, कोल्हापूर या आठ विभागातून १४ वर्ष मुलाचा/ मुलीचा प्रत्येकी १-१ संघ सहभाग घेणार असून आठ विभागातून १६ संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत.

स्पर्धाचा कालावधी- या कबड्डी स्पर्धेचे आयोजन १६ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस करण्यात आले आहे. सामने सायंकाळ सत्रात खेळवण्यात येतील.

स्पर्धाचे ठिकाण- विद्या प्रतिष्ठान, (क्रीडांगण) विद्यानगरी, बारामती, ता. बारामती जि. पुणे येथे आयोजन केले आहे.

स्पर्धा आयोजक- या स्पर्धेचे आयोजक हे स्पोर्ट्स अकॅडमी, बारामती हे असून अकॅडमीचे अध्यक्ष प्रो कबड्डी खेळाडू दादासो आवाड आहेत.

निवड चाचणी- शेवटच्या दिवशी १८ नोव्हेंबर रोजी निवड चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रत्येक विभागातुन ५ मुले व ५ मुली एकूण ८० खेळाडू निवड चाचणीत सहभागी होणार आहेत. यास्पर्धेतून महाराष्ट्र राज्याचा १४ वर्ष मुलाचा व मुलीचा संघ निवडला जाणार असून हा संघ राष्ट्रीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करेल.

महत्त्वाच्या बातम्या:

रोहित शर्मा, कुलदीप यादवची टी२० क्रमवारीत मोठी झेप

रिषभ पंतने २१ व्या वर्षी केला हा मोठा कारनामा; बनला रोहित शर्मा नंतरचा दुसराच खेळाडू

एकही चेंडू न खेळता भारतीय महिलांना मिळाल्या १० धावा, काय आहे कारण?

कर्णधार रोहित शर्मानेही केला विराट कोहली प्रमाणे मोठा पराक्रम